शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला रामराम; चाहत्यांना झटका

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या शो आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते; परंतु आता शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. एक पोस्ट करून तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले आहे. शिल्पाच्या या निर्णयानंतर चाहत्यांना झटका बसला आहे.

प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी सेलिब्रिटींना सोशल मीडिया हे माध्यम नेहमीच हवेहवेसे वाटते. आपल्या आवडत्या कलाकाराचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहतेही त्यांच्या पोस्टची वाट पाहत असतात; पण आता शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला रामराम ठोकल्याने तिच्या चाहत्यांना तिच्याविषयी काहीच जाणून घेता येणार नाही.

शिल्पा म्हणते….
शिल्पा शेट्टीने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे जो पूर्णपणे काळा आहे. हा फोटो शेअर करत शिल्पाने लिहिले की, ‘’अशाच गोष्टींचा कंटाळा आला आहे. सर्व काही सारखेच दिसत आहे. त्यामुळे जोपर्यंत मला नवीन अवतार मिळत नाही तोपर्यंत मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे.’’ यामागचे कारण सांगताना शिल्पा शेट्टीने म्हटले आहे की, ”सोशल मीडियावर सध्या एकसुरीपणा आला आहे. कुणाच्याही पेजवर गेल्यास तोच तोचपणा जाणवत आहे. रिल्स असो किंवा व्हिडिओ त्यामध्ये काहीच नावीन्य नाही. याचाच मला कंटाळा आला आहे. माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी घडामोड होईल तेव्हाच मी सोशल मीडियावर परत येईन.”

https://www.instagram.com/p/CdclXGzDvfR/?utm_source=ig_web_copy_link

शिल्पाचे २५.३ मिलियन फॉलोअर्स
दोन दिवसांपूर्वी शिल्पाने तिचा एक फोटो आणि त्यासोबत एक प्रेरणादायी मेसेज लिहून पोस्ट केली होती. त्यामध्ये ती असे म्हणतेय की, आत्मविश्वासाने जगा आणि एक चांगली व्यक्ती बनून समाजात रहा, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शिल्पा तिच्या दोन्ही मुलांसोबत दिसत असून यामध्ये मुले तिचा मेकअप करत आहेत. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतरही तिने सोशल मीडियापासून फारकत घेतली नव्हती. त्या काळात ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय असायची. दुसरीकडे राज कुंद्राने तुरुंगातून सुटताच आपले सोशल मीडियावरील अकाऊंट डिलीट केले. शिल्पाने सोशल मीडियापासून फारकत घेण्याचा निर्णय अचानक कसा काय घेतला? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. शिल्पा शेट्टीच्या इन्स्टाग्राम पोस्ट खूपच वैविध्यपूर्ण दिसतात. यात फिटनेस, योगासने, प्रेरणादायी संदेश, रविवारचा दिवस आणि निरोगीपणाशी संबंधित पोस्टचा समावेश आहे. शिल्पाचे जवळपास २५.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. पोस्ट्समध्ये शिल्पा शेट्टीच्या फॅशन चॉईसदेखील पहायला मिळतात.

https://www.instagram.com/reel/Cc-V8NxFaro/?utm_source=ig_web_copy_link

शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून अनेक कौटुंबिक वादात अडकली आहे. तिचा पती राज कुंद्रा याच्यावर पॉर्नफिल्म प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तिला हातातील काम सोडाव लागले होते. त्याचाही तिच्या जीवनावर परिणाम झाला होता. आता ती यातून बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याच्या शोधात आहे.

शिल्पाच्या निर्णयाने चाहते नाराज
शिल्पा शेट्टी शेवटची ‘हंगामा २’ या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटात शिल्पाशिवाय परेश रावल, राजपाल यादव, मीजन जाफरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता शिल्पा दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या शिल्पा गोव्यात आहे. रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलीस फोर्स’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रोहित शेट्टी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. यात शिल्पासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहे. शिल्पा सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत राहीलच; पण तिच्या सोशल मीडियावर मात्र ती काही काळ तरी दिसणार नसल्याने चाहते नाराज झाले आहेत.

https://www.instagram.com/tv/CdSQgidDj9K/?utm_source=ig_web_copy_link

 

Share