धक्कादायक..! सहा महिन्यात एकाच मुलीचे वेगवेगळ्या मुलांसोबत सहा लग्न

औरंगाबाद : दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात नुकतेच लग्न झालेल्या नवऱ्याला सोडून अचानकपणे पळून गेलेल्या नवरीमार्फत मराठवाड्यातील एक मोठे रॅकेट उघड झाले आहे. लग्न होत नसलेल्या मुलाचे कुटुंबांना टार्गेट करत दोन ते पाच लाखात वधू विकणारे हे रॅकेट आहे.

http://https://analysernews.com/the-bride-walks-away-with-her-jewelry-saying-get-your-tickets-ill-get-you-something-to-eat/

महत्वाचे म्हणजे हे रॅकेट मराठवाडा, खान्देशासह गुजरातमध्येही पसरले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जळगाव शहरातील दोन महिला हे रॅकेट चालवतात. या दोघींनी स्वतःच्याच भाचीचे सहा महिन्यात तब्बल सहा वेळा लग्न लावले. अमळनेर येथे त्यांचे बिंग फुटले अन् मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही रॅकेट चालवणारी टोळी मात्र अद्याप फरार आहे. पुढील तपासासाठी मुलीला दौलताबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अधिक तपासाअंती याप्रकरणी आणखी बाबी स्पष्ट होतील. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share