गोड बातमी! अजिंक्य रहाणेच्या घरी चिमुकल्याचं आगमन

मुंबई : भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य  रहाणे दुसऱ्यांदा बाप झाला आहे. काल सकाळी (५ ऑक्टोबर) अजिंक्यची पत्नी राधिकाने मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी अजिंक्यने सोशल मीडियावर पोस्ट करून सर्वांना दिली.

अजिंक्यने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज (बुधवारी ५ ऑक्टोबर) सकाळी राधिका आणि मी आमच्या बाळाचं जगात स्वागत केलं. राधिका आणि बाळ दोघंही सुखरुप आहेत. तुमच्याकडून मिळालेलं प्रेम आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद!”

अजिंक्य रहाणेने २६ सप्टेंबर २०१४ साली राधिकासोबत लग्न केलं. याच्या ५ वर्षांनंतर २०१९ साली या दोघांना पहिलं मूल झालं. त्यानंतर जुलैमध्ये त्यांनी आपण पुन्हा आईबाबा होणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं. प्रेग्नंट राधिका, रहाणे आणि आर्या अशा तिघांचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. ऑक्टोबरमध्ये आपलं बाळ या जगात येणार असल्याचं या कपलने सांगितलं. काल ५ ऑक्टोबरला त्यांच्या बाळाचं आगमन झालं. ५ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांची पहिली मुलगी आर्याचा जन्म झाला होता. त्यानंतर ३ वर्षांनी बरोबर पहिल्या मुलीच्या जन्मादिवशीच त्यांना दुसरा मुलगा झाला आहे.

Share