‘डंकी’मध्ये शाहरुख खानसोबत दिसणार तापसी पन्नू, या चित्रपटांमध्ये दिसल्या मिस-मॅच जोड्या.

शाहरुख खान ४ वर्षानंतर राजकुमार हिराणींच्या ‘डंकी’ या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होत असेलल्या या चित्रपटात तापसी पन्नू पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत दिसणार आहे. दोघांच्या वयात तब्बल २२वर्षांचे अंतर आहे. खरं तर शाहरुखने आता वयाची पन्नाशी ओलांडली आहे. पण चेह-यावरील सुरकुत्या लपवत अधिक तरुण दिसण्याच्या लालसेने स्वतःपेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना तो जराही कचरत नाही. याआधीही शाहरुखने त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स केला आहे. यापूर्वीही अनेक चित्रपटांत अशा मिसमॅच जोड्या प्रेक्षकांना बघायला मिळाल्या आहेत. त्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया-

४१ वर्षीय करीना कपूर २०१२ मध्ये इम्रान खानसोबत ‘एक मैं और एक तू’ या चित्रपटात दिसली होती. करीनाचे वय इम्रानपेक्षा जास्त आहे, अशा स्थितीत दोघांचे रोमान्स प्रेक्षकांना खटकणारा होता.

गोविंदा आणि कतरिना कैफ ‘पार्टनर’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. ही जोडी इंडस्ट्रीतील मिस मॅच जोड्यांपैकी एक आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे या चित्रपटात सलमान खान देखील मुख्य भूमिकेत होता, जो गोविंदा आणि कतरिना यांना एकत्र करण्याचे काम करतो.

१९५७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटात सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार नर्गिस यांच्या मुलांच्या भूमिकेत होते. सुनील आणि नर्गिस एकाच वयाचे होते, पण राजेंद्र नर्गिस यांच्यापेक्षा वयाने मोठे असूनही त्यांच्या मुलाच्या भऊमिकेत झळकले होते. आई-मुलाच्या भूमिकेत दिसलेले सुनील-नर्गिस खऱ्या आयुष्यात पती-पत्नी होते.

शाहिद कपूर २००९मध्ये आलेल्या ‘दिल बोले हडिप्पा’ या चित्रपटात राणी मुखर्जीसोबत दिसला होता. शाहिद खऱ्या आयुष्यात राणीपेक्षा २वर्षांनी लहान आहे, त्यामुळे दोघांच्या वयातील फरक पडद्यावरही स्पष्ट दिसत होता.

१९८८मध्ये आलेल्या ‘दयावान’ या चित्रपटात माधुरी दीक्षित विनोद खन्नासोबत झळकली होती. या चित्रपटातील ‘आज फिर तुम पे’ या गाण्यातील विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा रोमान्स सर्वांनाच चकित करणारा होता. माधुरी विनोदपेक्षा २१वर्षांनी लहान आहे.

Share