गायक सोनू निगमसह संपुर्ण कुंटुबाला कोरोनाची लागण

मुंबई : देशभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्राॅन बंधितांमध्येही वाढ होत आहे. बॉलीवूडसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडले असून बॉलीवूडचा सर्वात प्रिसिद्ध गीतकार सोनू निगम याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: सोनू निगमने इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू निगमसोबत त्यांचा मुलगा निवान निगम, पत्नी मधुरिमा निगम यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

सोनूने शेअर केलेल्या या व्हिडीओत तो म्हणाला की, “तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी कोव्हिड पॉझिटिव्ह आहे. अनेकांना हे माहित आहे आणि अनेकांना नाही. पण मी कोविड पॉझिटिव्ह आहे असे मला वाटत नाही हे देखील तितकेच खरं आहे. मी दुबईत आहे. मला भारतात यायचे होते, कारण मला भुवनेश्वरमध्ये परफॉर्म करायचे होते आणि सुपर सिंगर सीझन ३ चे शूटिंगही करायचे होते. पण जेव्हा माझी करोना चाचणी करण्यात आली तेव्हा मी पॉझिटिव्ह आढळलो. पण मला आशा आहे की मी हळूहळू बरा होईन.असे सोनू निगम याने म्हटले आहे.

Share