प्रिटींग मिस्टेकवाल्यांची संगत बरी नाही…

**मुंबई-** महानगरपालिकेच्या निवडणूका काही महिन्यांवर आल्या असताना शिवसेनेकडून मुंबईकरांसाठी नव वर्षाच गिफ्ट देण्यात आलं. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० चौरस फुट पर्यंतच्या सर्व घरांवरील मालमत्ता कर माफ करण्यात आल्याची घोषणा केली होती.त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1478240913428082691?s=20

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हंटल आहे , निवडणूक येताच काँग्रेसने जाहीरनाम्यात घोषणा केल्या आणि सत्ता आल्यावर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगून वारंवार हात झटकले. मग तो विषय झोपडपट्टी नियमित करायचा असो, मोफत वीज देण्याचा असो वा मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा असो.६० वर्षे केवळ घोषणा फसवणूक आणि प्रिंटींग मिस्टेक आता बस्स…

तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हंटल आहे की,मालमत्ता कर माफ करत हे वारे महाराष्ट्र भर चालेल परंतू नागरिकांना माहित आहेच. काँग्रेस प्रमाणेच प्रिंटिंग मीस्टेक झाली तर, तसेच प्रिटींग मिस्टेकवाल्यांची संगत बरी नाही अस त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.

Share