बाॅलिवूड पाठोपाठ मराठी सिनेसृष्टीत कोरोनाचा शिरकाव

मुंबई : बाॅलिवूड पाठोपाठ मराठी सिनेसृष्टीत देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मराठी सिनेअभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत:अंकुश चौधरीने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

अभिनेता अंकुश चौधरीने ट्विटमध्ये म्हटलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशिर्वाद आहेच. कोरोनावर मात करुन पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात पुन्हा तुमच्यासमोर येईल, असा विश्वास अंकुशने व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे अंकुशने त्याच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या आणि काही लक्षणे दिसल्यास त्वरित कोरोना चाचणी करुन घ्या, अशी विनंती केली आहे.

दरम्यान सध्या अंकुश चौधरी डाॅक्टरांच्या सल्लानुसार उपचार सुरु आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मराठी सिनेसृष्टी पुन्हा एकदा जोशाने सुरू झाली होती. मराठी कलाकार त्यांची काळजी घेऊन शुटींग करत होते. मात्र कोरोनाने मराठी कलाकारांनाही निशाणा बनवत मराठी सिनेसृष्टीत शिरकावा केला आहे.

Share