100-200 नागरिकांना आणून सरकार जाहिरातबाजी करतय,राऊतांची केंद्रावर टिका

मुंबई- युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम सुरु केलीय. रविवारी सकाळी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुखारेस्टहून आलेल्या भारतीयांचे दिल्ली विमानतळावर गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करताना शिंदेंनी मोदींचा अनेकदा उल्लेख केल्याच पहायला मिळाल. मात्र यावर संजय राऊत यांनी टिका केली आहे.

१५०-२०० भारतीयांना मायदेशी आणून मोदी सरकार डंका पिटवतंय जाहीरातबाजी करतंय. युक्रेनमध्ये १५ हजारहून अधिक भारतीय अडकलेत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावलाय. भारतीय मुलांना मारहाण होतेय, केंद्र सरकार मागे पडतंय असं वाटतं का?, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, नक्कीच असं म्हटलं आहे. आतापर्यंत जगात अनेक युद्धं झाली. इराकपासून अफगाणिस्तानपर्यंत. पण अशाप्रकारे एखाद्या देशात भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले नव्हते, असंही राऊत ‘टीव्ही ९ मराठी’शी म्हणालेत.

पुढे बोलताना त्यांनी या मोहिमेच्या नावावर आक्षेप घेतला. उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘ऑपरेशन गंगा’ नाव देण्यात आलं आहे, अशी टीका त्यांनी केली. उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत म्हणून ‘ऑपरेशन गंगा’. देशाची मुलं संकटात असताना तुम्हाला तिथे निवडणुका आणि प्रचार दिसतोय. पक्षाचा प्रसार दिसतोय तर त्याला मी राष्ट्रीय बाणा म्हणत नाही, असा टोला राऊत यांनी लागवला आहे.

Share