भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे राज्यपालांना सभागृह सोडावे लागले

मुंबई :  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाची सुरुवात वादळी झाली आहे.  राज्यपालांच्या अभिभाषणात  छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आल्यानंतर महाविकासआघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळेच राज्यपाल भाषण पूर्ण न करताच निघून गेले, अशी चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडलेली  दुर्दैवी घटना आज घडलेली आहे. भाजपच्या आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. आम्हीही विरोधी पक्षात होतो पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही.”, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच राज्यपाल सभागृहात आले तेव्हा महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत त्यांचे स्वागत केले. मात्र भाजपच्या लोकांनी गोंधळ घातला, फलकं झळकवली त्यामुळे राज्यपाल महोदय राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान आहे. असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Share