या अभिनेत्रीच्या फोटोच्या नादात दुकानदाराचे नुकसान

बिग बॉस’ फेम अभिनेत्री गौहर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गौहर ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गौहर चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच गौहरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गौहरचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत गौहर बाजारात असल्याचे दिसत आहे. यावेळी गौहरचे फोटो काढायला आलेल्या फोटोग्राफर्सकडून दुकाना समोर असलेल्या मॅनिक्विनला धक्का लागतो आणि तो मॅनेक्विन खाली पडला आणि त्याचा हाता पण तुटला.हा प्रकार पाहून गौहर चांगलीच चिडली आणि थेट गाडीत जावून बसली. त्यामुळे हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Share