तुर्तास पेट्रोल भाववाढ नाही; ग्राहकांना दिलासा

आज शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर ‘जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय घेतला. सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल झाला नाही, यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.मुंबईत आज एक लीटर डिझेलचा १०४.७७ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत डिझेल ९६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर १००.९८ रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९९.८२ रुपये झाला आहे.मुंबईत आज शनिवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १२०.५१ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११५.०८ रुपये इतका असून चेन्नईत पेट्रोलचा भाव ११०.८९ रुपये इतका आहे.

देशभरात २२ मार्च २०२२ पासून पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या १४ वेळा दरवाढीने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, तामिळनाडु, केरळ यासह डझनभर राज्यांमध्ये पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे. या इंधन दरवाढीचा रिझर्व्ह बँकेने देखील धसका घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने महागाईचे उद्दिष्ट वाढवले आहे. नजीकच्या काळात कच्च्या तेलाचा भाव १०० डाॅलरच्या नजीक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू वर्षात महागगाई दर ५.७ टक्के इतका राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे.

कमॉडिटी बाजारात काल शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव १००.७७ डॉलर इतका वाढला आहे. त्यात १६ सेंट्सची वाढ झाली. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ९६.३७ डाॅलर इतका झाला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ३.४ टक्क्यांनी कमी झाला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर तोडगा निघण्याची शक्यता धूसर बनली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. तीन आठवड्यापूर्वी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव १३९ डाॅलरपर्यंत वाढला होता.आज शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर ‘जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय घेतला. सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल झाला नाही, यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

Share