ठाण्यातील दोन नेत्यांना कोरोनाची लागण

ठाणे : राज्यातील मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची ताजी असताना ठाण्यातील दोन शिवसेना नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारे, ओळव माजिवाड विधानसभेचे आमदार प्रताप सरनाईक या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांची प्रकृत्ती उत्तम असून प्रताप सरनाईक हे डाॅक्टरांच्या सल्यानुसार मुंबईतील रुग्णालयात दाखल असून राजन विचारे हे गृहविलगीकरणात असल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे.

कोरोना काळामध्ये मागील दोन वर्षापासून विविध प्रकारे कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी त्यांच्या संपर्कात असून देखील आई जगदंबेच्या आशीर्वादाने कोरोनाच्या संसर्गापासून दूर होतो. परंतु आज सकाळी कोरोना टेस्ट केली असता माझी आर. टी. पी. सी.आर.टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी ठीक आहे काळजी नसावी परंतु मी कोरोना पॉझिटिव झाल्याने मागील दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व आपली तसेच आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असल्याने यातून लवकर बाहेर पडेन असा विश्वास खा. राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे.

 

तर दुसरीकडे ओवळा- माझिवाडाचे आमदारप्रताप सरनाईक हे देखील पाॅझिटिव्ह आले असून त्यांनी ट्विट करत हि माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉजीटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी तसेच आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी ही विनंती.

Share