उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद कळलंच नाही, निवडणुक आली की….

मुंबई : राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. भाजपविरोधात सर्व राजकीय पक्षाचे आमदार एकत्र येणे, आमदार फुटू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवणे, त्यांना अज्ञातस्थळी नेने यासह अनेक क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.  ते म्हणाले की, काय शिवसेनेची अवस्था झाली आहे. कुठली ही निवडणूक आली जिथे आमदारकीचं मतदान होणार असेल तर बॅगा भरून आमदारांना बसमध्ये टाकून हॉटेलमध्ये कोंबण्यात येतं. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यापासून ही लपवालपवी शिवसेनेसाठी नवीन नाही, मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंना कळलंच नाही, असं म्हणत त्यांनी सडकून टीका केली आहे. त्यामुळे आता यावर मु्ख्यमंत्री ठाकरे काय उत्तर देणार पहावे लागणार आहे.

दरम्यान संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्र्यांसोबत राज्यसभेचं समीकरण जुळवून आणण्यासाठी बैठक घेणार आहे. आणि संध्याकाळी मुख्यमंत्री राज्यातील अन्य अपक्ष आमदारांसोबत बैठक घेणार असून त्यांचं मन वळवण्याचं काम सुरू आहे. आता निलेश राणेंच्या या ट्विटवर शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Share