महाराष्ट्रात तलवारी येता कुठुन?

२७एप्रिल ची दुपार मुंबई आग्रा महामार्गावर धुळेच्या दिशेने सुसाट वेगात धावनारी गाडी पोलीसांच्या ताफ्यान अडवली. संशयीत गाडीची तपासणी केली असता ८७ तलवारी आणि काही खंजीरीचा साठा पोलीसांच्या हाती लागला. त्यात विषेश म्हणजे त्यापुर्वीच औरंगाबाद आणि पिंपरी-चिंचवड अशा राजकीय संवेदन शील भागात तलवारींचा अवैध साठा अढळल्याच पाहायला मिळाल. भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावरुन राज्यात राजकारण पेटलय. अशात राज्यातील विविध शहरात सापडत असलेल्या तलवारी आणि इतर शस्त्राशांचा अर्थ काय? हा शस्त्राचा साठा नेमका येतोय तरी कुठुन ? हे सगळे प्रश्न उपस्तित होतात. आर्मस अॅक्ट १९५९ नुसार तलवार हा  शस्त्राचा एक प्रकार मानला जातो. त्यामुळे तलवार सोबत बाळगण्यासाठी कायद्यातील तरतुदी नुसार परवाणा घ्यावा लागतो. अस असतांनाही राज्यात अवैध माप्गाने तलवारी मागवल्या जात आहे.सामाजीक दृष्या संवेदनशिल औरंगाबाद शहरामध्ये तर कुरीयर कंपणीच्या माध्यमातुन हा व्यवहार होत असल्याच समोर आल.

पोलीसांनी DTDC या कुरीयर सेवा कंपणीवर झापा टाकल्या नंतर त्यातुन ६५ तलवारी जप्त करण्यात आल्या. पिंपरीतही अशाच प्रकारच्या तलवारी अन शत्रांचा साठा सापडला पार्सलला सांकेतीक कंमाक दिल्यान आणि पार्सल कॉश स्वरुपात बुक करण्यात आल्यान कुरीयर कंपणीच्याही ते लक्षात येत नसे .औरंगाबाद आणि पिंपरी-चिंचवड या भागांमघ्ये सापडलेल्या य़ा अवैध तलवारींचा तपास केल्यानंतर याचे धागे-दोरे थेट पंजाबात जाउन पोहचले.अमृतसर , जालींदर या भागातुन या तलवारी मागवण्यात येत होत्या. पंजाबात शिख बांधवाना कायशीर दृष्या कृपाण वापरण्याची परवानगी ददेण्यात आली आहे. संविधानातील कलम२५ नुसार कॉपाण सोबत बाळगण शिख बांधवांच्या दार्मिक स्वातंत्र्याचाच एक भाग माणल जात. मात्र याचाच फायदा उचलत राज्यांच्या इतर भागांतही तलवारी अगदी बिनदीक्कतपणे पाठवण्यात येत आहे. ऑनलाईन सेवा सुरू झाल्यानंतर त्याला चांगलीच चलती आली आहे. विशेष म्हणजे गुगलवर तलवार विकत घ्यायची असं, सहज टाकलं तरी डझनभर वेबसाईटवर तलवारींची ऑनलाइन डिलिव्हरी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतात. आर्मी एकसारखा कठोर कायदा अस्तित्वात असतानाही असा प्रकार सुरूच आहे .

तलवारी  का मागवण्यात येत आहेत याचा तपास केल्यावर काही धक्कादायक बाबी समोर आल्या फोटोग्राफर फोटोशूटसाठी तर काहीजण दिखाव्यासाठी म्हणून तलवारींच्या ऑनलाईन खरेदी करत आहेत तलवार बाळगण्यासाठी परवन लागतो आणि सापडल्यास दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते याची साधी कल्पनाही त्यांना ही राज्यातील परिस्थिती पाहता सध्या भुंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे अशातच तलवारींचा साठा काही अगणित प्रकार घडण्याची संकेत तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित कायदा आणि सुव्यवस्थेच्या रावण नको तिथे कारवाईचा बडगा उचलणारे सरकार आता या प्रकरणी काही तातडीने पावले उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share