विधानसभेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३ आणि ४ जुलैला विशेष अधिवेशन बोलावत नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. याच अधिवेशनात पहिल्याच दिवशी म्हणजे ३ जुलैला विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दीपक केसरकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यातही राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. भाजप आमदार यांची आज संध्याकाळी बैठक होणार आहे, त्या बैठकीत वरील नावांवर चर्चा होणार आहे. या चर्चेतून विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. हे अधिवेशन ३ आणि ४ जुलैला होणार आहे. सुरुवातील २ आणि ३ जुलैला अधिवेशन बोलावलं होतं. मात्र, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलैला बोलावण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Share