भाजपला राष्ट्रपती पदाची निवडणूक सोपी जाणार !

दिल्ली- पाच पैकी चार राज्यातील विजयाने राष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपला सोपी झाली आहे. कारण चारही राज्यात भाजपाने बहूमत मिळवत सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे त्यांना मित्र पक्षाला जास्त विनवण्या करण्याची गरज भासणार नसल्याच स्पष्ट झालं आहे. उत्तराखंड , उत्तरप्रदेश , गोवा आणि मणिपूर या राज्यात बहूमताने भाजप विजयी झाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये संख्याबळ घटले असते तर भाजपला मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागले असते. पाच राज्यांमधील एकूण ६९० जागांपैकी ३५० जागा भाजपने जिंकल्या आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला २५० जागांवर यश मिळाले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे २०८ आहे. भाजप व मित्र पक्षांच्या मतांच्या आधारे एकूण ८३,८२४ मतांच्या मूल्यापैकी भाजपला ५८ हजारांच्या आसपास मते मिळू शकतात. उत्तर प्रदेशातील यशाने भाजप राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत निर्धास्त राहू शकेल.

उत्तर प्रदेशच्या तुलनेत उत्तराखंड, गोवा किंवा मणिपूरमधील मतांचे मूल्य हे कमी आहे. पण तिन्ही राज्यांमध्ये एकूण मतांच्या मूल्याच्या निम्म्यापेक्षा अधिक मते भाजपला मिळतील. देशात सर्वाधिक मतांचे मूल्य हे उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेश जिंकल्याने भाजपचे मतांचे गणित जुळले आहे.

Share