यवतमाळमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या !

य़वतामळ- यवतमाळ जिल्ह्यातील भाबंराजा येथे एका शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य सुनील डिरवे असे मृत पदाधिकाऱ्याचे नाव आहे. डिवरे यांच्यावर आधी गोळीबार करण्यात आला नंतर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली.  तीन अज्ञात व्यक्तींनी हि हत्या केल्याचे म्हंटले जात आहे.

४० वर्षीय सुनील डिवरे हे स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय लोकप्रितिनिधी होते. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही होते. डिवरे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी कळताच  त्यांच्या घराजवळ गर्दी जमा झाली. डिवरे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने डिवरे यांचा रुग्णालयामध्ये आणण्याआधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

डिवरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी नागपूर-तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे . टायरची जाळपोळ करण्यात आली. सर्व आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. घटना स्थळी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून आमदार संजय राठोड हे देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.

Share