स्थिरता, हा स्वभाव प्राण्यांचा नाही, तसा तो मनुष्यप्राण्याचा पण नाही. जग आर्टीफिशीयल इंटलिजन्सच्या प्रभावीखाली जात आहे. त्याठिकाणी स्थिरता हि निश्चतच राहणार नाही. सतत यंत्रवत राहण्याची सवय मनाला,तनाला करावी लागेल या भितीने विचारवंताना ग्रासल आहे. स्थिरता संबंधाने प्रयत्न होऊ नयेत यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. हि शक्ती नेमकी कोणती आहे, असावी ? याबाबत संशोधनाला जसा वाव आहे, तसा या संशोधनामुळे देखील अस्वस्थ होत जायला होणार आहे. निवांतपणा हरखूण घेण्यास भ्रमणध्वणी उर्फ कर्णपिश्चाचाने सुरुवात केली. मनुष्याच्या उत्क्रांती पासून क्वाट्री की पॅड पर्यंत ते टच स्क्रिनचा प्रवास,यात क्वाट्री की पॅड आणि तिथन टच स्क्रिनचा प्रवास थक्क करणारा आहे. या प्रवासात, मनुष्य भावनां, शुन्य होत चालल्या आहेत, अशी ओरड नुकतीच सुरू झाली होती. या विचाराला राजकीय जमात आणि त्यांची पोशींदी यांनी हे निरिक्षण फोल ठरवीले. त्यामुळे मानवी जगण्याचे भाष्यकारी, युवाल नोआ हरारी, सगळीकडे एआय ची भीती पसरवीत, फिरत आहेत. त्यांच्या या कृतीत काही अर्थ नाही, असे आता वाटयला लागलं आहे.
क्वाट्री कि पॅड ते टच स्क्रिन या मानव विकासकाळात, पाश्चिमत्य देशातून वायटू के, व्हायरस, कोवीड, साऱख्या माध्यमातून भारतीय मनावर भिती घालण्याचे सातत्याने चाललेले प्रयत्न आणि त्यात भारतीय मानसिकतेने केलेला प्रखर विरोध पाहता, आताशी येऊ घातलेल्या एआय रुपी वाढत्या कृत्रीम बुध्दीमतेचे आणि तिच्या फैलावावर निर्बंध घालणाऱ्या नियमकांची निश्चितच पुढील शंभर पिढ्यांना गरज लागणार नाही, हे अनुभवयाला येत आहे. कारणही तशीच आहेत, येथे ईव्हीएम कढुनं बॅलेट पेपर कडे, असा उलटा प्रवास करण्याची ओढ विरोधी मनाला लागलेली आहे. एआय उलटा प्रवास करु शकेल का नाही, याचा देखील शोध घ्यावा लागणार आहे.
एका माथेफिरु (?) ने संविधानाचे पावित्र्य हणण करण्याच केलेला प्रयत्न, आणि त्यानंतर उसळलेली दंगल, ज्यांचा या विषयाशी काडीमात्र संबंध नाही, अशांच्या वाहनांची तोडफोड, दुकानांची जाळपोळ करीत, भाजीपाला वाल्यांचे गाडे उलथवत, प्रवासी तीनचाकी वाहनांची काच फोडत, यात भावनांचा स्तर उंचावर नेऊन, त्यातून खाली आपटत राबवली गेलेली यंत्रणा. दोषी नेमकं कोण ? याचा शोध न घेता, दिसेल त्याला दोषी ठरवत, वातावरण सातत्याणे पेटतं राहने यासाठी चाललेले प्रयत्न, एआय ला पण थकवायला लावेल.
घटनेच्या गावात, प्रथम जिल्हाप्रशासन, मग पोलीस यंत्रणा, त्यातली विशिष्ट अधिकारी, करीत करीत, लोण आजूबाजूच्या जिल्ह्यात पसरवीत, त्याचा धुर मनुवाद्यावर तिथून सनातनी मानसिकतेपासून, विशिष्ट जात जमातीवरुन, मुख्यमंत्री व्हाया मोदी असा प्रवास करीत आहे. अतिरेकी हे अल्पसंख्यांक समाजातून जन्माला येतात, तर नक्षलवादी हे चळवळीच्या समाजातून निर्माण होतात, असा एक जावाई शोध देखील शांतता समितीच्या बैठकीत लागल्याचं अनुभवयला आलं. अशा कल्पना, शोध लावण्यासाठी हजारो एआय दम तोडतील.
संविधानाच्या प्रतिकृतीचे पावित्र्य फक्त त्या माथेफिरूने धोक्यात आणलं. त्याला असा कोणता विचार,हे कृत्य करण्यास भाग पाडीत आहे, याचा शोध घ्या असा पुसटसा विचार समोर येतो ना येतो, तोच दुसऱ्या बाजूने, दैनंदीन व्यवहार बंद पाडण्याची केली गेलेली घाईगडबड. यात त्या गावच्या लोकांनी खरेतर पुढील पाच सहा दिवस सर्वच व्यवहार बंद ठेवायला पाहीजे होते, म्हणजे आंदोलक नरमले असते, हा एक विचार घेऊन इतर जिल्ह्यातील व्यवहार अर्धवट बंद, चालू, चालू बंद करीत पोलीस विभागाकडून न्यायालयाकडे हस्तांतरीत झालेला दंगलीतला एक सहभागी (सरकारी नोंदी प्रमाणे) याचा ऱ्हद्यविकाराने झालेला मृत्यु, त्यात त्याचा शवविच्छेदानाचा अहवाल, समाजमाध्यमांवर उपलब्ध होतो ना होतो, तेवढ्यात पोलीसांनी केलेली मुस्काटदाबी, यावर तावातावाने बाजू मांडणाऱ्या एका साठी उलटलेल्या विजयी कार्यकर्त्याचा झालेला अकस्मिक मृत्युपुढील पराजय. या कार्यकर्त्याचा मृत्यु पुर्वी त्यांच्या प्रकृती संबंधाने माहिती न घेता, त्यांच्या मृत्युवर भावनांचा होणारा उद्रेक. यावर काय नाटय घडणांर याची वाट उदया पाहण्याशिवाय सामान्य जनतेला पर्याय शिल्लक नाही. यावर भाकीत करण्यासाठी एआय ची बुध्दी देखील निश्चीतच आटेल.
संविधानावर तिकडे दिल्लीत बाळराजांनी केलेली लायकी नसलेली वक्तव्ये, त्यात त्यांना आलेला सावरकरांचा पुळका, आणि केंद्र शासन हे संविधानाचा फारच लाड करीत आहे, असे विरोधाभास निर्माण करणारे सुदैवाने देशाच्या भाग्यास खरचं न लाभलेलें नेतृत्व. मंदपणाचे कारण अनुकरण करणे होय. वारंवार त्याच त्याच मंदबुध्दीच्या बौध्दीकतेच अनुकरन करीत स्वतःला व देशाला मंद करण्याची जिद्द, त्यापुढे एआय देखील मंद पडेल. या नेतृत्वापुढे एआय आत्महत्या करु शकतं. वारंवार करु शकंत.
या सर्वात, न्यायलयीन व्यवस्थेचं गेल्या दोन तीन दिवसांत निघालेले वाभाडे, भ्रष्टाचारामुळे झालेले भजं, त्यामुळे तिकडे लक्ष जाणार नाही याची काळजी घेणारी वृत्तपत्रे, ईलेक्ट्रोनिक मिडीया. यात देखील कायदे विषयक प्रणालीसाठी निर्माण करण्यात आलेली एआय प्रणाली सपशेल हार पत्कारेल.
निवडणूकींच्या पश्चात लोकशाही स्थिरावत जाते, अस एक अलिखीत समिकरण आहे. सत्ता प्राप्ती न झाल्यामुळे त्यासमिकरणाचे धिंडवडे कसे काढता येईल यासाठी, देशापातळीवर माती खालेलं, एक दगाबाज वयोवृध्द नेतृत्व, या सर्व नेपथ्यामध्ये त्याच्या राजकन्येसह, चेल्याचपाट्यासह अखंड बुडालेलं आहे. त्याच्यातील असलेल्या किडा सदृश प्रवृत्तीला पाहूण, एआय मधली किडा प्रणाली देखील तेलात बुडूण गतप्राण होईल.
अगले पाचसौ सांल तो तुम्हारा एआय और उसका भूत, यंहा नही चल पायेगा. और हां फेक नेरेटिव्ह का भूत तुम्हारे एआय की ताकदसे हजारो गुणा बडा और ताकतवर है. क्योंकी हमे, सत्य घरसे बाहर आकर चप्पल पैहनेतक, झुठ पुरे गांवमे घुमकर आता है, ये वाली कहावत का अनुभव ज्यादा है. नेक्सस के सक्सेस के लिये तुम्हे प्रयत्नो की और आवश्यकता है हरारी मोशाय….!! इसीलीये भाई “ युवाल नोआ हरारी”, तुम, वापस ले जाओ तुम्हारे विचांरो की एआय तुतारी.