राज्यातील रस्त्याच्या चौपदरीकरणांसाठी ६६३ कोटीचा निधी मंजूर

लवकरच औरंगाबाद जिल्हयातील दौलताबाद टी पॉइंट ते माळीवाडा या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. त्याचबरोबर कन्नडमधील देवगाव रंगारी ते शिवूरच्या रस्त्याचे  करण्यासाठी १८५.५९ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. याशिवाय नंदुरबार आणि सोलापूर जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या कामांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या सर्व कामांसाठी एकूण ६६३.७९  कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील NH-७५३B च्या शेवाळी (साक्री) ते नंदुरबार विभागाचा रस्ता दुपदरी करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील ३२.८५७ किलोमीटर लांबीची अतिरिक्त पुलाची कामे करण्यासाठी २३२.५९कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील NH-५६१ या शिरापूर जंक्शन ते शिवाजी चौक रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याशिवाय बार्शी नाका ते जरूड फाटा या २४.५ किलोमीटर रस्त्याचे २ -लेन तसेच ४ -लेनमध्ये अपग्रेडेशन करण्यासाठी २४५.६१३ कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे.

Share