अजिंठा लेण्या बघण्यासाठी मिळणार रोप वे ची सुविधा

औरंगबादेतील जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजिठा लेण्या आता रोप वे ने बघता येणार आहेत. ऐतिहासिक वारसा स्थळी आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी भारतीय पुरात्वीय विभाग आता प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आता वेरूळ लेण्यात इलेक्ट्रिक वाहन आणि अजिंठा येथे रोप वे करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला आहे. त्याला मंजूरी मिळयानंतरच पुढील काम सुरू होईल अस सांगण्यात आलय.पावण्यात आला आहे. अजिंठा लेणीतील रोप वे हा व्ह्यू पॉइंट ते तिकीट खिडकी पर्यंत असेल पुरत्वीय खत्यातर्फे सांगण्यात आलय. सध्या अजिंठा लेण्यात लेण्या बघण्यासाठी असेलेला डोलीचा पर्याय मर्यादित स्वरूपाचा आहे.

दुसरीकडे वेरूळ मध्ये दोन मीटरच्या परिघात ३२ लेण्या आहेत. पण बऱ्याचदा शेवटच्या काही लेण्या दूर आहेत म्हणून पर्यटक तेथे जाण्याचा कंटाळा करतात,पर्यटकांना या लेण्या पाहता याव्या म्हणून २० इलेक्ट्रिक बसेसचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यासाठी लागणारे रस्ते, वाहनांची क्षमता या सगळ्यांवर पुरत्वीय विभाग काम करणार आहे. येत्या मे महिन्यांपर्यंत या बसेस सुरू होतील असे पुरात्वीय विभागातर्फे सांगण्यात आलय.

 

Share