‘ऐ मेरे वतन के लोगों…’ लता मंगेशकरांची अजरामर गाणी

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

भारतातील ‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांनी २० भाषांमध्ये ३०,००० हजार गाणी गायली आहेत. त्यांच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमीं मंत्रमुग्ध होत असत. म्हणूनच त्यांना संगीतातील गानसरस्वती म्हटले जायचे. आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील. ‘नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ ही पहचान है ग़र साथ रहे… !’ लतादिदी यांनी गायलेल्या या गाण्याप्रमाणे आज शरीराने जरी त्या नसल्या तरी त्यांचे स्वर कायम आपल्यात राहतील.

लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आले, तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळाला. त्यांच्या आवाजातली शालीनता आणि गोडवा कधीही विरला नाही. त्यांच्या गाण्यांनी नेहमीच श्रोत्यांच्या कानांना मंत्रमुग्ध केले.

‘मेरी आवाजही पहचान है मेरी..’

‘मेरी आवाजही पहचान है मेरी…’ हे लतादिदींचं गाणं म्हणजे त्यांच्या जिवनाचं वर्णन करणारं आहे. लता दिदींची विशेष ओळखही त्यांचा आवाज आहे… आणि त्यांची ही जोवर सूर्य चंद्र आहे तोवर लता मंगेशकर यांची ही ओळख कायम राहिल.

 

अजीब दास्तां है ये
हे गाणे ‘दिल अपना और प्रीत पराई’ या चित्रपटातील आहे. ‘ट्रॅजेडी क्वीन’ अभिनेत्री मीना कुमारी हिने या गाण्यात आपले अतृप्त प्रेम गमावल्याची व्यथा मांडली आहे.

 

‘ऐ मेरे वतन के लोगों’
‘ऐ मेरे वतन के लोगों’ लतादिदींचं हे गाणं म्हणजे राष्ट्रप्रेमाने ओतप्रेत भरलेली देशवासियांना घातलेली भावनिक साद… तुमच्या माझ्या मनातलं देशप्रेम त्यांच्या आवाजातून व्यक्त होतं, असंच हे गाणं ऐकताना जाणवतं.

‘लग जा गले…’

‘लग जा गले…’ हे गाणं म्हणजे लता दिदींच्या गायकीचा सर्वोच्च बिंदू ठरला. त्यांचं हे गाणं ५८ वर्षानंतरही तितकंच फ्रेश आहे. ‘वो कौन थी’ या चित्रपटातील या गाण्याच्या सुरात सगळेच हरवून जातात. मनातील इच्छा व्यक्त गायलेले हे गाणे सर्वांनाच आवडते.

सलाम-ए-इश्क’

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटातील ‘सलाम-ए-इश्क’ या गाण्याचे बोल प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत. लतादीदींचा आवाज आणि रेखाच्या शैलीने गाण्यात वेगळीच नजाकत निर्माण केली.

 

लता मंगेशकर यांची हिट गाणे

Share