अजरामर गाण्यांमुळे लतादिदी सदैव आपल्यासोबत असतील – चंद्रकांत पाटील

मुंबई : संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने अनेक दशके मंत्रमुध्य करणाऱ्या मानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. तथापि, आपल्या अजरामर गाण्यामुंळे त्या सदैव आपल्यासाबेत असतील,  अशा भावना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

चंद्रकांत पाटील यांनी संदेशात म्हटलं की,  दैवी, सुरांमुळे आणि अलैकिक गायनामुळे लता मंगेशकर यांना देशातील घराघरात आणि मनामनात स्थान मिळाले आहे. आयुष्यातील सुखदु:दुखाच्या अशा दोन्ही प्रसंगात लता मंगेशकर यांना गायलेली गाणी मनाला साद देतात. महान गायिक असण्यासोबतच त्या तितक्याच देशभक्त होत्या. त्यांना आपल्या देशाच्या संस्कृतीचा अभियान होता. तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली होती. अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादिदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share