केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कोरोना पाॅझिटिव्ह

**जालना :** राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री देखील कोरोना बाधित होत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रावसाहेब दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते सध्या सायसोलेशनमध्ये आहेत. दोनच दिवसांपुर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.

रावसाहेब दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार देखील कोरोना बाधित
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरनासृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्या विलगीकरणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात घेत आहेत.

Share