ठरलं! दीपाली सय्यद आज शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दीपाली सय्यद यांनी स्वत: याबाबत अधिकृत माहिती दिलीय. आज दुपारी १ वाजता ठाण्यातील  टेंभीनाका येथील कार्यालयात  त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एकी घडवून आणणार असल्याचं वक्तव्य अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केलं होतं. मात्र, बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी रिपब्लिकन चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या सुषमा अंधारेंना पक्षात आणलं होतं. तेव्हापासून दीपाली सय्यद या नाराज असल्याचं बोललं जात होतं.

Share