वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या औरंगाबाद शहरात बरीच मंदिरं आहेत. शहराच्या विविध भागात विविध नावाची हनुमानाची मंदिरं आपल्याकडे पाहायला मिळतात जस की सुपारी हनुमान मारुती मंदिर, रोकडिया हनुमान मंदिर या मंदिराची ही नाव कशी पडली,या नावामागे काही काय कारण आहे याविषयी आजच्या व्हीडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊयात.
शहरातील गुलमंडी मधील सुपारी हनुमान मंदिर आपल्या सगळ्यांना परिचित आहे. हे मंदिर जवळपास अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीच मंदिर आहे. निजामकाळात या मंदिरासमोर सुपारीचा बाजार भरत होता. या काळात एक सुपारी ठेवून त्याला शेंदूर लावून पूजेस सुरुवात झाली. आज हे मंदिर सुपारी हनुमान मंदिर म्हणून ओळखले जात आहे. या मंदिरात हनुमानाची साडेतीन फुटांची स्वयंभू मूर्ती आहे या मंदिराचा जीर्णोद्धार स्व. विजय पुजारी यांनी केला होता. या मंदिराची देखभाल रवींद्र पुजारी, अनंत पुजारी, राहुल पुजारी करीत आहेत.
औरंगाबाद मधील रोकडिया हनुमान कॉलनी तर आपल्याला माहितीच आहे. मोंढा नाका सिग्नलजवळून जाफर गेटकडे जाताना डाव्या बाजूला ही कॉलनी आहे. या ठिकाणी ४०० वर्ष जुने निजामकालीन रोकडिया हनुमान मंदिर आहे. निजामकाळात या भागातून लोकांकडून महसूल गोळा केला जात होता. त्यामुळे या मंदिराला रोकडिया हनुमान मंदिर असे नाव पडले. मूळ मूर्ती दोन फुटांपर्यंत असून शेंदूरलेपन करून साडेपाच फूट झाली. २००० मध्ये जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते जीर्णोद्धार केला आला होता.
राजाबाजार जाधवमंडी परिसरात जबरे हनुमान मंदिर आहे. तत्कालीन आसाराम मिस्त्री-कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचे काम झाले. या मंदिरातील ही मूर्ती दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वीची आहे. काही लोकांच्या मते, ही मूर्ती औरंगाबादेतून बाहेर नेली होती. त्या वेळी लोकांनी शोधून पुन्हा मूर्ती जबरदस्तीने औरंगाबादेत आणली तेव्हा पासून या मंदिराला जबरे हनुमान मंदिर अस नाव देण्यात आल.
औरंगाबाद जवळील वेरूळ येथून चार किलोमीटर अंतरावर खुलटबाद येथील भद्रा मारूती नवसाला पावणारा मारुती म्हणून ओळखला जातो. खुलताबाद येथे भद्रसेन नावाचा राजा त्या राजाच्या नावावरून भद्रा मारुती हे नाव पडल होत, तो राजा राम भक्त होता.ऐकेदिवशी राम भक्तीत लीन होऊन तो गाण गात असताना हनुमानजी आकाशातून जात होते.त्यांनी ही गाणी ऐकली आणि त्यांनी योगमुद्रा धारण केली. जेव्हा भद्र राजाने गाण संपवून डोळे उघडले तेव्हा त्यांनी हनुमानजीना पाहिल त्यांनी येथेच आणि राहून भक्तांना आशीर्वाद देण्याची विनंती भद्र राजाने हनुमानजीना केली, तेव्हापासून येथील मारुतीला भद्रा मारुती म्हणतात अशी आख्यायिका येथे सांगण्यात येते.
पैठण गेट येथील रॉक्सी टॉकीजच्या समोरील नागोसानगर भागात २५०-३०० वर्षांपूर्वीचे निजामकालीन कानफाटे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. पूर्वी या भागात संपूर्ण जंगल होते. येथे ज्वालानाथ बाबांनी मंदिराची स्थापना केली. त्यांच्या कानात लांब लोलक घातलेले असायचे, तर एक कान फाटलेला होता. त्यामुळे या मंदिराला कानफाटे हनुमान मंदिर नाव पडले.