उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा सवाल

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश क्रीडा मंच सभागृहात सभा पार पडली. राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठकरे यांच्या अंगावर आंदोलनाची एक तरी केस आहे का, असा सवाल करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोलनाक्याच्या आंदोलनानंतर राज्यातील ७० टोलनाके महाराष्ट्रातले बंद झाले. बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही का? मुंबईत बॉलिवुडमध्ये पाकिस्तानी कलाकार येत होते. या देशातून हाकलून दिलं त्यांना. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे? जेव्हा रझा अकादमीच्या लोकांनी मोर्चा काढला आणि पोलीस भगिनींना घोळका करून त्यांच्या अब्रूवर हात घालण्यात आला. बाहेरचे मुसलमान तिथे आले होते. त्याच्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. बाकी कुणी नाही काढला. कोणतं हिंदुत्व बोलताय तुम्ही? उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगावी की तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? भूमिकाच कुठली घ्यायची नाही. असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

Share