MHT-CET-2022 लांबणीवर; उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : महाराष्‍ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET 2022) पुढे ढकलण्‍यात आली आहे, अशी माहिती उच्‍च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज ट्विटरच्‍या माध्‍यमातून दिली. JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होईल. CET परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्‍यात येईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात जेईई (JEE Mains 2022), नीट ( NEET) आणि सीईटी (CET) परीक्षा पुढे ढकलण्‍यात आली होती. याच काळात वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) ही होत आहे. त्‍यामुळे MHT-CET 2022 परीक्षा पुढे ढकलण्‍याचा निर्णय घेण्‍यात आल्‍याचे उदय सामंत यांनी म्‍हटले आहे.

https://twitter.com/samant_uday/status/1517030931575762944?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517030931575762944%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fmaharashtra%2F164187%2Fmaharashtra-cet-exam-in-august-after-jee-and-neet-exams%2Far

खरेतर महाराष्ट्राची सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी (CET) जूनमध्ये घेतली जाणार होती. याबाबतची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी २५ मार्चला केली होती. संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) जून आणि जुलैमध्ये आयोजित केली जाणार आहे. जेईईच्या पहिल्या सत्राची परीक्षा २९ जूनला तर ३० जुलैला दुसऱ्या सत्राची परीक्षा संपणार आहे. तसेच राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (NEET UG 2022) १७ जुलैला होणार आहे. या दोन्ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे (NTA) घेतल्या जातात. या परीक्षा संपल्यानंतर ऑगस्टमध्ये महाराष्ट्राची सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी (CET) होईल, असे सामंत यांनी जाहीर केले आहे. जेईई, नीट आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी असू नयेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत होती. त्‍यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्‍यात आल्‍याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Share