मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर राणा दाम्पत्या विरोधात निवडणूक लढवतो

बीड : शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी मला आदेश दिला तर राणा दाम्पत्या विरोधात अमरावतीत जाऊन, रवी राणा यांच्या विरोधात धनुष्यबाणावर निवडणूक लढवतो असे म्हणत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राणा दाम्पत्याला आव्हान केले आहे. बीडमध्ये आयोजित प्रा.सुरेश नवले मित्र मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी सत्तार माध्यमांशी बोलत होते.

राज्यमंत्री अब्दुल सत्तर म्हणाले की, राणे चार आणेसारखी गोष्ट कतर आहेत. चार आणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान करत आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी केलं. त्यांचं लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणुन देशात नाव आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

Share