सुपरस्टार चिरंजीवीला कोरोनाची लागण

नवी दिल्ली :  देशभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्राॅन बंधितांमध्येही वाढ होत आहे. अशातच दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवीला कोरोनाची लागण झाली आहे.  स्वत: चिरंजीवीने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

चिरंजीवीने ट्विट मध्ये म्हटंल की, प्रिय मित्रांनो, योग्य काळजी घेतल्यानंतरही काल किरकोळ लक्षण जाणवल्यानंतर माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी घरी आहे. आणि, गेल्या काही दिवसांमध्ये जे माझ्या संपर्कात आले त्यांनी सगळ्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसंच पुन्हा एकदा मला त्याच जोशात पाहण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही, अशी पोस्ट चिरंजीवीने ट्विटर  शेअर केली आहे.

Share