गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करताय? मग आधी पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. देशात सलग ८० व्या दिवशी पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, यापूर्वी २१ मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट केली होती. केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल ९.५० रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झालं होतं.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल ९५ डॉलर प्रति बॅरलपेक्षा स्वस्त झालं आहे. अशातच भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. आज दर स्थिर असून कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही.

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय ?

महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर १०६.२५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९४.२२ रुपये प्रति लिटर आहे. तसेच, पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५ रुपये तर डिझेलचा दर ९२ रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.७४ रुपये तर डिझेलचा दर ९३.२३ रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.२३ रुपये तर डिझेलचा दर ९२.५८ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Share