टॉलिवूड अभिनेत्री समंथा मानधनाच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा महागडी

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकण्यात टॉलिवूडची ही अभिनेत्री यशस्वी झाली आहे. बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा अधिक मानधन घेणारी अभिनेत्री अशी समंथा हिची नवी ओळख बनली आहे. एका चित्रपटासाठी समंथा ५ ते १० कोटींच्या दरम्यान मानधन घेते. समंथाच्या मानधनाचा हा आकडा बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा कितीतरी जास्त आहे. तीन मिनिटांच्या गाण्यासाठी समंथा पाच कोटी रुपयांपर्यंत मानधन घेत असल्याची माहिती आहे.

समंथा रुथ प्रभू हिच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळणारा प्रतिसाद पाहता ती किती लोकप्रिय आहे हे लक्षात येते. समंथा ही टॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेत्री आहे. काही महिन्यांपूर्वी समंथा रुथ प्रभू हिचा चैतन्य नागार्जुनशी घटस्फोट झाला. टॉलिवूडमधील सर्वाधिक प्रसिद्ध असणारे हे जोडपे जेव्हा वेगळे झाले तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. समंथा आणि चैतन्य नागार्जुन यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. समंथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपण नागा चैतन्यापासून वेगळे होत असल्याचे सांगितले होते. नागा चैतन्यानेदेखील सोशल मीडियावर तसेच काही मुलाखतींमध्ये समंथाविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले होते. त्यानंतर काही दिवसांतच समंथाचा ‘पुष्पा : द राईज’ हा चित्रपट आला. या चित्रपटात तिने एक आयटम साँग केले होते. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटात टॉलिवूडचा सुपरस्टार अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फैसल हे प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात समंथाने बोल्ड लूकमध्ये ‘ऊ अंटावा….’ हे आयटम साँग केले होते. त्या गाण्यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. हे गाणे भलतेच लोकप्रिय झाले. समंथाच्या चाहत्यांना या गाण्यातील अंदाज भलताच भावला होता.

समंथाची एकूण संपत्ती ही ८० कोटींच्या आसपास आहे. काही दिवसांपूर्वी तिने मायानगरी मुंबईमध्ये नवे आलिशान घर खरेदी केले आहे. तिला महागड्या गाड्यांची भारी हौस आहे. समंथाचा चाहतावर्ग मोठा आहे. समंथा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे.

समंथा आणि नागा चैतन्य यांचे हे दोघे जेव्हा वेगळे झाले तेव्हा त्यांच्या लाखो चाहत्यांना खूप वाईट वाटले होते. फक्त टॉलिवूडच नाही तर बॉलिवूडमध्येदेखील त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. हे जोडपे वेगळे झाले तेव्हा त्यांच्या चाहत्यांचा या बातमीवर सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. शेवटी समंथाने सोशल मीडियावरुन जाहीर केले की, ”माझ्यात आणि नागा चैतन्य यांच्यात आता कोणत्याही प्रकारचे नाते नाही. आम्ही एकमेकांपासून विभक्त झालो आहोत”. समंथाने हा खुलासा केल्यानंतर चाहत्यांना खात्री पटली. त्यानंतर मात्र दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. नागा चैतन्यने एका मुलाखतीमध्ये समंथावर अप्रत्यक्षपणे काही आरोप केले होते. ज्यावेळी ‘द फॅमिली मॅन’ नावाच्या वेबसीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला तेव्हापासून त्यांच्यात वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली, असे सांगितले जाते.

समंथा आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेतल्यानंतर त्याच्याकडून दोनशे कोटींची पोटगी समंथाने नाकारली होती. एवढी मोठी पोटगी नाकारून समंथाने स्वत:च्या बळावर आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी तिचा ‘पुष्पा : द राईज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये समंथाने केलेल्या आयटम साँगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिचा विजय सेतूपती, नयनतारा यांच्याबरोबर एक विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. नागा चैतन्यपासून वेगळे झाल्यापासून समंथा तिचे आयुष्य आणखी वेगळ्या पद्धतीने जगू पाहत आहे. सध्या समंथाच्या आगळ्यावेगळ्या लूकची चर्चा आहे. तिचा बिकीनी लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत.

https://www.instagram.com/p/CedeaIbrGAg/?utm_source=ig_web_copy_link

समंथाने परिधान केलेल्या बिकीनीचा प्राईज टॅग व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर समंथाने तिचा हा बोल्ड लूक व्हायरल केला आहे. तिने घातलेली ती बिकीनी ३४ हजारांची असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीदेखील समंथाच्या बोल्ड लूकने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. मात्र, आता तिच्या बिकीनीच्या प्राईज टॅग पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ‘द टॉलिवूड क्लोसेट’च्या इंस्टाग्राम पेजवरून तिच्या बिकीनीचा प्राईज टॅग व्हायरल झाला असून, त्यावर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. ”पतीकडून शंभर कोटींची पोटगी नाकारून समंथा ३४ हजारांची बिकीनी परिधान करून दंगा करते आहे”, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Share