शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. संजय राऊत यांची आई, पत्नी, मुलगी, आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यात गेल्या दिवसापासून राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यात राज्यातील १३ मंत्री, ४ खासदार तसेच ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खा. अरविंद सावंत, राजन विचार, आ. रोहित पवार, धीरज देशमुख, प्रताप सरनाईक, राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील आदींना कोरोनाची लागण झाली आहे.

Share