दिवाळीत दिसायचे फिट आणि सुंदर, तर वाढलेले वजन असे करा कमी

अवघ्या बारा दिवसांवर दिवाळी आली आहे. सण समारंभ म्हणजे कुटुंबासोबत मजामस्ती करण्याचे आणि पोटभरुन स्वादिष्ट गोडधोड पदार्थ खाण्याचे दिवस आहेत. परंतु सणांमध्ये ही मस्ती तसेच कमी झोप आणि एक्सरसाईजला कानाडोळा केल्याने त्याचे परिणाम तुमच्या शरीरीवर दिसू शकतात.

दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. त्यातच तुमची फिगर मेंटेन असेल तर तुम्हाला घातलेले कपडे छानच दिसतील. मात्र तुमचे शरीर जर एक्स्ट्रा फॅटमुळे बेढब दिसत असेल तर सणांची मजा कमी होऊन जाते. यासाठी आम्ही तुम्हाला काही डिटाॅक्स प्लान सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या शरीरावरील एक्स्ट्रा चरबी कमी होईल. तसेच १० दिवसांत तुम्ही तुमची फिगर मेंटेन करू शकाल.

सकाळचे ड्रिंक
आपल्या दिवसाची सुरूवात एक ग्लास गरम पाणी आणि लिंबूच्या रसासोबत करा. हे गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. तसेच मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होईल. तुम्ही हे ड्रिंक अधिक चवदार करण्यासाठी यात मध मिसळू शकता.

अति खाणे नको
तुम्ही किती खात आहात यावर तुमचे लक्ष नसेल तर छोट्या प्लेटमध्ये खाण्यास सुरूवात करा. यामुळे अति खाणे होणार नाही तसचे अतिरिक्त कॅलरीचे सेवन करण्यापासून स्वत:चा बचाव करू शकता. सर्व पदार्थांचा आनंद घ्या मात्र लक्षात ठेवा की जंक फूड आणि गोड खाणे टाळा.

सलाडला आपल्या डाएटमध्ये जरूर करा सामील
आपल्या जेवणात नेहमी सलाडचा समावेश करा. खासकरून जेव्हा तुम्ही ऑईली खात आहात तेव्हा सलाड जरूर खा. सलाड खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.सलाडमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त वजन घटवण्यास मदत होते.

Share