दारूपेक्षा इंधनावरील कर कमी करा; पेट्रोलियममंत्र्यांचा ठाकरे सरकारला टोला

नवी दिल्ली : वाढत्‍या इंधन दरावरून केंद्र सरकार व बिगर भाजपशासित राज्‍यांमध्‍ये चांगलीच जुंपली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगर भाजपशासित राज्‍यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करून सर्वसामान्‍यांना दिलासा द्यावा, अशी सूचना केली होती. यानंतर आज केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील ‘व्‍हॅट’ कमी करण्‍यावरून महाराष्ट्र सरकारला टोला लगावला आहे. राज्य सरकारने दारूपेक्षा इंधनावरील कर कमी केला तर पेट्रोल आणि डिझेल स्‍वस्‍त होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी महाराष्ट्र व अन्‍य राज्‍यांतील पेट्रोल दराची तुलना करणारी आकडेवारीच जाहीर केली आहे. मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्‍हटले आहे की, सरकारने दारूपेक्षा इंधनावरील कर कमी केला तर पेट्रोल आणि डिझेल हे स्‍वस्‍त होईल. महाराष्‍ट्र सरकार पेट्रोलवर ३२.१५ रुपये प्रति लिटर ‘व्‍हॅट’ आकारत आहे, तर काँग्रेस शासित राजस्‍थान सरकार २९.१० रुपये प्रति लिटर ‘व्‍हॅट’ आकारते. तसेच भाजपशासित उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्‍ये पेट्रोलवर अनुक्रमे १४.५१ आणि १६.५० रुपये प्रति लिटर ‘व्‍हॅट’ आकारला जात आहे. सर्वसामान्‍य नागरिकांना दिलासा देण्‍यासाठी बिगर भाजपशासित राज्‍यांनी तत्‍काळ पावले उचलावीत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

https://twitter.com/HardeepSPuri/status/1519514101554106368?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519514101554106368%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fnational%2F169108%2Fpetroleum-minister-attacked-maharashtra-goverment-on-petrol-and-disel-price%2Far

महागाईत भरडणार्‍या जनतेला दिलासा द्या
महाराष्‍ट्र सरकार इंधनावर कर रुपात मोठी रक्‍कम वसूल करत आहे. महाराष्‍ट्र सरकारने २०१८ मध्‍ये इंधनावरील करातून ७९ हजार ४१२ कोटी रुपये मिळवले. यावर्षी ३३ हजार कोटी रुपये कर रुपात मिळण्‍याची शक्‍यता आहे. राज्‍य सरकारने महागाईत भरडत असणार्‍या जनतेला दिलासा देण्‍यासाठी इंधनावरील ‘व्‍हॅट’ का कमी केला नाही, असा सवालही पुरी यांनी केला आहे.

 

Share